मुख्यमंत्री सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी,किती मिळतो, अर्ज, फॉर्म pdf महाराष्ट्र, हॉस्पिटल लिस्ट, योजना, कागदपत्रे, हेल्पलाइन,फोन,संपर्क नंबर, संभाजीनगर(औरंगाबाद), Mukhyamantri Sahayata Nidhi, Arogya Vaidyakiya Sahayata Nidhi, Chief Minister Medical Assistance Fund, Chief Minister’s Relief Fund (CMRF), Maharashtra, Form, pdf, hospital list, online application, contact phone number, documents, amount, yojana, Arj in marathi, email id, helpline number, application status, kosh, information in marathi, nagpur, pune, sambhajinagar (aurangabad).
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना (Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana), मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना (Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi Yojana) हि सम्पूर्ण भारत देशामध्ये सर्व राज्यांमध्ये संकटग्रस्तांसाठी, आपत्तीग्रस्तांसाठी राबवण्यात येणारी एक आर्थिक सहाय्यता प्रदान करणारी योजना आहे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत देशातील तसेच महाराष्ट्र राज्यातील संकटग्रस्तांना, आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्यता पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे, पूर ,अतिवृष्टी ,दुष्काळ ,आगीमुळे होणारे अपघात अशा नैसर्गिक संकटांमुळे,आपत्तींमुळे नुकसान झालेल्या बाधित नागरिकांना तसेच नैसर्गिक संकटांमुळे,आपत्तींमुळे मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीमार्फत आर्थिक पाठबळ, मदत, सहाय्य्यता प्रदान केली जाते पुरविली जाते.
तसेच जातीय दंगल, दहशतवादी हल्ला अशा अनैसर्गिक संकटांमुळे, आपत्तींमुळे मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे अशा नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत (Mukhyamantri Sahayata Nidhi) आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत, सहाय्यता पुरविली जाते.
मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य्यता (Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi) निधीसाठीचा अर्ज कुठे मिळतो, तो कसा भरायचा किंवा तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच घ्यावा का, त्या साठी कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, त्यासाठीची पात्रता, अपात्रता, अशा विविध शंका, प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असतात. सर्वसामान्य नागरिकांच्या या शंकांचं निरसन व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचा.

मुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय सहाय्यता निधी | Mukhyamantri Sahayata, Arogya, Vaidyakiya Sahayata Nidhi | Chief Minister’s Relief, Medical Assistance Fund in Marathi
योजना | मुख्यमंत्री सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, Chief Minister’s Relief Fund (CMRF) |
मंत्रालय | मुख्यमंत्री सहायता कक्ष, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील आपत्तीग्रस्त, आर्थिकदृष्ट्या गरीब व दुर्बल नागरिक |
उद्देश्य | महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता पुरविणे, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी अर्थसहाय्य पुरविणे. |
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे मिळण्यास पात्र असलेले नागरिक | Mukhyamantri Sahayata Nidhi (CMRF) Eligibility
- भारत देशाचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- नैसर्गिक व अनैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिक.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर व दुर्धर आजारांवर उपचार चालू असलेले नागरिक.
मिस्डकॉल द्या,फक्त एक फोन करा अन् तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मिळवा | Mukhyamantri Sahayata Nidhi (CMRF) Missed Call Phone Number
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी फक्त एका मिस्ड कॉल ची आवश्यकता आहे , या आधी निधी मिळवण्यासाठी खूप किचकट व वेळकाढूपणा प्रक्रिया होती, त्यामुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत होते, आता मात्र एका मिस्ड कॉल ची आवश्यकता आहे आणि निधी मिळावा.
ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना निधीसाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिझवावे लागतात. अनेकदा अर्ज भरताना चुका झाल्यास नव्याने प्रक्रिया करावी लागते. उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारी परवड लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिसकॉलवर अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. अर्जदाराने ८६५०५६७५६७ या क्रमांकावर मिस्ड कॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे प्राप्त होईल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अर्ज डाऊनलोड होईल अर्जाची प्रिंट काढून आवश्यक माहितीनुसार तो भरावा, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा आणि मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज व कागदपत्रे पी डी एफ PDF फॉरमॅट मध्ये स्कॅन करा. PDF फाईल स्वतःच्या मेल वरून aao.cmrf-mh@gov.in किंवा cmrf.maharashtra.gov.in या mail id वर पाठवण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज कसा करावा | How To Apply for CM Relief Fund, Maharashtra, Mukhyamantri Sahayata Nidhi (CMRF) Form, Arj In Marathi
पात्र नागरिक अर्ज करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीचा अवलंब करू शकता.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ऑनलाईन अर्ज कसा करावा | Mukhyamantri Sahayata Nidhi (CMRF) Online Application
- लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अँप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम मुख्यमंत्री सहायता निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाणे. वेबसाइट https://cmrf.maharashtra.gov.in/pdf/medical%20form.pdf आहे.
- CMRF वेबसाइटवर तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा फॉर्म अर्ज मिळेल तो डाउनलोड करा.
- आवश्यक माहितीनुसार अर्ज भरा अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा आणि मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज व कागदपत्रे पी डी एफ PDF फाईल फॉरमॅट मध्ये स्कॅन करा.
- PDF फाईल स्वतःच्या मेल वरून aao.cmrf-mh@gov.in या mail id वर पाठवणे.
- सर्व मूळ कागदपत्रे “मुख्यमंत्री कार्यालय , मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी ,सातवा मजला ,मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय ,मुंबई -400032″ या पत्त्यावर कुरिअर किंवा पोस्टाने पाठविण्यात यावे.
- पुढील निधीशी संबंधित चौकशीसाठी मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी कक्ष (०२२२२०२५५४० / ०२२२२०२६९४८) येथे संपर्क करावा.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ऑफलाईन अर्ज कसा करावा | Mukhyamantri Sahayata Nidhi (CMRF) Offline Application
- अर्जदाराने ऑफलाईन अँप्लिकेशनसाठी मुख्यमंत्री सहायता निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जाणे. वेबसाइट https://cmrf.maharashtra.gov.in/pdf/medical%20form.pdf आहे.
- वेबसाइटवर तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा चा फॉर्म अर्ज मिळेल तो डाउनलोड करा.
- आवश्यक माहितीनुसार अर्ज भरा अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्ज व सर्व मूळ कागदपत्रे “मुख्यमंत्री कार्यालय , मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी ,सातवा मजला ,मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय ,मुंबई -400032″ या पत्त्यावर कार्यालयात जमा करावे.
- पुढील निधीशी संबंधित चौकशीसाठी मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी कक्ष (०२२२२०२५५४० / ०२२२२०२६९४८) येथे संपर्क करावा.
नोंद :- मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीची प्रक्रिया स्वतः करावी कुठल्याही एजंट मार्फत करू नये.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कागदपत्रे | Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi (CMRF) Documents
- वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र दवाखान्यातील कोटेशनवर संबंधित डॉक्टर ची सही असलेली प्रत (खाजगी रुग्णालयास वैद्यकीय खर्च १.०० लाखच्या वरील असल्यास शासकीय रुग्णालयातील अधीक्षक/जिल्हा शल्य चिकित्सक मंजुरी/सही आवश्यक आहे) (राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत रुग्णालय असून सदर योजनेचा लाभ रुग्णास मिळत नसलेबाबत वैद्यकीय खर्चाच्या प्रमाणपत्रावर प्रमाणित करणे आवश्यक आहे)
- आजाराशी संबंधित रिपोर्टची झेरॉक्स प्रत
- अपघात असेल तर FIR किंवा MLC ची प्रत
- रुग्णाशी संबंधित खालील कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- मा. आमदार/खासदारांचे शिफारस पत्र
- अर्जदाराने भरलेला मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा अर्ज
- रुग्णालयाचा तपशिल:
- रुग्णालयाचे बँक खाते क्रमांक
- रुग्णालयाचे ज्या बॅकेत खाते आहे त्या बँकेचे नांव व शाखा
- रुग्णालयाचे खाते ज्या नावाने आहे ते नांव
- आय एफ एस सी (IFSC) कोड नंबर
- रुग्णालयाचा ई-मेल
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हॉस्पिटल लिस्ट | Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi (cmrf.maharashtra.gov.in) Hospital List
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हॉस्पिटल लिस्ट पाहण्यासाठी खालील बटण दाबा.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी रक्कम | Mukhyamantri Sahayata Nidhi (CMRF) Amount
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर खालील प्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत अंशतः अर्थसहाय्य केले जाते.
वैद्यकीय अंदाजित खर्च | मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्थसहाय्य |
---|---|
रु.२०,०००/- पर्यंत | रु.१०,०००/- |
रु.२०,००१/- ते रु.४९,९९९/- पर्यंत | रु.१५,०००/- |
रु.५०,०००/- ते रु.९९,९९९/- पर्यंत | रु.२०,०००/- |
रु.१,००,०००/- ते रु.२,९९,९९९/- पर्यंत | रु.३०,०००/- |
रु.३,००,०००/- ते रु.४,९९,९९९/- पर्यंत | रु.४०,०००/- |
रु.५,००,०००/- व त्यापेक्षा जास्त | रु.५०,०००/- |
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नावे
- कॉकलियर इम्प्लांट (वय वर्ष 2 ते 6)
- हृदय प्रत्यारोपण
- यकृत प्रत्यारोपण
- किडणी प्रत्यारोपण
- बोन मॅरो प्रत्यारोपण
- फुफ्फुस प्रत्यारोपण
- हाताचे प्रत्यारोपण
- हिप रिप्लेसमेंट
- कर्करोग शस्त्रक्रिया
- अपघात शस्त्रक्रिया
- लहान बालकांचे शस्त्रक्रिया
- मेंदूचे आजार
- हृदयरोग
- डायलिसिस
- अपघात
- कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)
- नवजात शिशुंचे आजार
- गुडघ्याचे प्रत्यारोपण
- बर्न रुग्ण
- विद्युत अपघात रुग्ण
प्रश्न आणि उत्तर :-
प्रश्न – मुख्यमंत्री सहायता निधी काय आहे?
उत्तर – मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना हि सम्पूर्ण भारत देशामध्ये सर्व राज्यांमध्ये संकटग्रस्तांसाठी, आपत्तीग्रस्तांसाठी राबवण्यात येणारी एक आर्थिक सहाय्यता प्रदान करणारी योजना आहे.पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.
प्रश्न – सीएम रिलीफ फंड कसा अप्लाई करावा?
उत्तर – अर्जदाराने ८६५०५६७५६७ या क्रमांकावर मिस्ड कॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे प्राप्त होईल, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अर्ज डाऊनलोड होईल, अर्जाची प्रिंट काढून आवश्यक माहितीनुसार तो भरावा, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा आणि मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज व कागदपत्रे पी डी एफ PDF फॉरमॅट मध्ये स्कॅन करा, PDF फाईल स्वतःच्या मेल वरून aao.cmrf-mh@gov.in या mail id वर पाठवणे.
अधिक वाचा :-
- (APY Chart) अटल पेंशन योजना रिटायरमेंट नंतर नो टेंशन | अटल पेंशन योजना प्रीमियम चार्ट | Atal Pension Yojana 2025
- APY Chart | अटल पेंशन योजना कैलकुलेटर प्रीमियम चार्ट | Atal Pension Yojana Calculator Premium Chart
- प्रधानमंत्री पीएम किसान सम्मान निधि योजना 2025 | Pradhan Mantri PM Kisan Samman Nidhi Yojana 2025